Gold-Silver Rate: Falling Gold Prices; Silver also fell by Rs 770, know today's exact price!
Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत घसरण; चांदीचा भावही ७७० रुपयांनी झाला कमी, आजचा नेमका दर, जाणून घ्या..! By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:38 AM2022-05-18T11:38:31+5:302022-05-18T11:50:18+5:30Join usJoin usNext लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,२९० रूपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत ४९० रुपयांची घट झाली. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४६,१०० रुपये इतके आहे. तर १ किलो चांदीचा दर ६०,७८० रूपयांवर व्यवहार करत आहे. काल चांदीचा दर ६१,५५० रुपयांवर होता. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver