Gold-Silver Rate: Gold prices fall, silver prices fall, find out, today's rate!
Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा दर! By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 03:41 PM2022-05-04T15:41:52+5:302022-05-04T15:49:30+5:30Join usJoin usNext लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,२०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver