Gold- Silver Rates: रशिया अन् युक्रेनच्या युद्धाचा भारतीय बाजारांमध्ये परिणाम; सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:22 PM 2022-03-31T14:22:02+5:30 2022-03-31T14:25:01+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा २२ कॅरट सोन्याची किंमत आज ४७ हजार ६४० रुपये इतकी झाली आहे.
दुसरीकडे चांदीचे आजचा दर ६७ हजार ४०० रुपये प्रति किलो एवढा आहे.
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.