श्री राम भक्तांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी भाविकांसाठी खुलं होणार अयोध्येतील भगवान रामाचे मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:49 PM2021-08-04T17:49:36+5:302021-08-04T18:16:13+5:30

Ayodhya Ram Temple: राम मंदिराचं निर्माण कार्य भाविकांना स्वतःच्या डोळ्यांना पाहता येणार आहे.

आयोध्या: अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर 2023 पर्यंत तयार होणार आहे. दरम्यान, राम भक्तांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

आयोध्येतलं राम मंदिर भाविकांसाठी कधी खुलं केलं जाणार याची तारीख समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये राम भक्तांना या भव्य-दिव्य मंदिरात भगवान श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे.

सध्या आयोध्येत मोठ्या वेगानं राम मंदिराचं बांधकाम सुरू असून, 2023 पर्यंत मंदिर बांधून पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल.

यासोबतच श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भाविकांसाठी आणखी खास सुविधा उलपब्ध केली जाणार आहे. ती म्हणजे, राम मंदिराचं निर्माण कार्य भाविकांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.

यासाठी एक व्ह्यू पॉईंट उभारण्यात येणार आहे, जिथून राम मंदिराचं सर्व निर्माण रामभक्तांना पाहाता येईल.

श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्रमार्फत संपूर्ण देशातून मंदिर निर्माणासाठी निधी संकलन सुरू आहे. राम मंदिर निर्माण समिति आपल्या कार्यात पूर्णपणे झोकून काम करत आहे.

मागच्या वर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं होतं. या भूमिपूजनाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे.

या भूमिपूजनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोध्येत विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलंय. ट्रस्टकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

Read in English