government gear up for corona vaccination know step by step process
तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस?; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 04:17 PM2020-12-28T16:17:16+5:302020-12-28T16:20:05+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे गेला आहे. काल दिवसभरात देशात २० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र तरीही कोरोना लसीकरण वेगानं सुरू होणं गरजेचं आहे. लवकरच केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणास मंजुरी मिळू शकते. त्यामुळे सरकारनं लसीकरणाची रंगीत तालीम सुरू केली आहे. आज गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली. या ड्राय रनमध्ये येणाऱ्या अडथळे, त्रुटींनुसार लसीकरण प्रक्रियेत सुधारणा करण्यात येतील. सर्वात आधी कोरोना लसींचे डोज राज्यांमध्ये पाठवण्यात येतील. तिथून ते जिल्हा, शहर, गावांमध्ये पाठवले जातील. कोरोना लसीच्या भंडारातून लसी पाठवल्या जात असताना त्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. त्यांचं तापमान वारंवार तपासून पाहण्यात येईल. सध्याच्या घडीला तीन लसी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र त्यांची साठवणूक करण्याचं तापमान वेगवेगळं आहे. त्यामुळे तापमान योग्य राहील याची काळजी घेतली जाईल. लसीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असताना लस ज्यांना दिली जाणार आहे, त्यांना एसएमएस पाठवण्यात येईल. लस टोचली जाणार असलेल्या व्यक्तीला लसीकरणाच्या पथकाची, वेळ आणि ठिकाणाची माहिती एसएमएसमधून दिली जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीनं देण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन लस टोचून घ्यायची आहे. सुरुवातीच्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस दिली जाणार असून त्यात आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, इतर कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असेल. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus