In the Gujarat assembly elections, Modi stood in the queue and voted for the right to vote
गुजरात विधानसभा निवडणूकीत मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:23 PM2017-12-14T23:23:46+5:302017-12-14T23:30:11+5:30Join usJoin usNext गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान झालं. अमित शहा यांनी अहमदाबादमधील नाननपूरा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील शाळेत जाऊन मतदान केलं. त्यांचं वय 97 वर्ष आहे. यावेळी त्यांनी भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. . पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मोदींनी साबरमतीमधील रानिप येथील 115 क्रमांकाच्या बूथवर मतदान केलं. मतदान करण्यासाठी पोहोचलेले नरेंद्र मोदी यावेळी रांगेत उभे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही साबरमतीमधील राणिप येथील केंद्रावर मतदान केलं. मतदानानंतर मोदी केंद्राबाहेर आले. त्यावेळी लोकांनी रस्त्यावर तुफान गर्दी केली होती. मोदींनीही कारच्या फूटबोर्डवर उभं राहून लोकांना अभिवादन केलं.टॅग्स :गुजरात निवडणूक 2017नरेंद्र मोदीGujarat Election 2017Narendra Modi