गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रुपाणी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 20:45 IST2017-12-22T20:40:54+5:302017-12-22T20:45:23+5:30

अहमदाबाद : गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे.

गुजरातमध्ये काठावरचं बहुमत मिळवून सत्ता राखण्यात यशस्वी ठरल्यानंतर भाजपा राज्यात नेतृत्वबदल करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान, २५ डिसेंबर रोजी विजय रुपाणी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी शक्यता आहे.

नितीन पटेल यांनाही उपमुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यावर एकमत झाले. विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये भाजपाने सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली आहे. पण या निवडणुकीत भाजपाचे मताधिक्क्य आणि जागा ब-यापैकी घटल्या आहेत. 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपाला फक्त 99 जागांवर समाधान मानावे लागले.