Gujarat Floods : पुराचे थैमान! गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती भीषण, 69 जणांचा मृत्यू; रौद्ररुप दाखवणारे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:53 PM 2022-07-13T12:53:53+5:30 2022-07-13T13:12:18+5:30
Gujarat Floods : गुजरातमधील छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी, पंचमहाल या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुजरातला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर आला असून नवसारीच्या रस्त्यांवर पूर्णा नदी वाहताना पाहायला मिळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुजरातच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 69 जणांना जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी, पंचमहाल या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.
गुजरातमधील 9 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अहमदाबाद, नवसारी, नडियाद आदी शहरांमध्ये अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. पावसाने थैमान घातले आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागातून एकूण 27,896 लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी 18,225 अजूनही शेल्टर होममध्ये आहेत. पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण गुजरातच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि सौराष्ट्र प्रदेशातील कच्छ आणि राजकोटच्या काही भागात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
दक्षिण गुजरातमधील नर्मदा, सुरत, डांग, वलसाड आणि तापी जिल्हे आणि राज्याच्या मध्यवर्ती भागातील पंचमहाल आणि छोटा उदयपूरमध्ये गेल्या एका दिवसात जोरदार पाऊस झाला. नवसारी जिल्ह्यात पूर्णा आणि अंबिका नद्यांना पूर आला असून, काही सखल भागात पूर आला आहे.
हवामान खात्याने सौराष्ट्रातील वलसाड, नवसारी, सुरत, तापी, डांग, नर्मदा, छोटा उदयपूर जिल्ह्यांसह कच्छ, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका आणि मोरबी येथे बुधवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हवामान खात्याने सौराष्ट्रातील वलसाड, नवसारी, सुरत, तापी, डांग, नर्मदा, छोटा उदयपूर जिल्ह्यांसह कच्छ, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका आणि मोरबी येथे बुधवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.