देशात सर्वांत 'खर्चीक' राज्य गुजरात! हिमाचल सर्वात स्वस्त; महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर? By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:36 AM 2024-06-26T10:36:13+5:30 2024-06-26T10:45:27+5:30
गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत राहणाऱ्या लोकांना तुलनेत जास्त खर्च येतो. महागाई रोजच्या रोज वाढत चालली आहे, उत्पन्न आणि खर्च यांची तोंडमिळवणी कशी करायची, असा प्रश्न गरिबांनाच नाही, तर अगदी उच्चमध्यमवर्गीयांनाही पडू लागला आहे.
जीवनावश्यक गरजांसाठीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मोठ्या शहरांत तर हा खर्च आणखीच जास्त आहे.
अर्थात राज्याराज्यांनुसार यात फरक आहे. त्यातही देशात गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्यं सर्वाधिक 'महागडी' आणि खर्चिक आहेत.
गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत राहणाऱ्या लोकांना तुलनेत जास्त खर्च येतो.
श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब या सर्वांची सरासरी काढली तर गुजरातमध्ये लोकांचा महिन्याचा सरासरी खर्च आहे ४६,८०० रुपये, तर दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात ४५,४०० रुपये.
या तुलनेत हिमाचल प्रदेशातील लोकांचा महिन्याचा सरासरी खर्च सर्वात कमी म्हणजे २३,६०० रुपये आहे. बिहारही तसे 'स्वस्त'च आहे.
सर्वात 'खर्चीक' पाच राज्ये (आकडे हजारात) गुजरात (४६.८), महाराष्ट्र (४५.४), मिझोराम (४३.५), कर्नाटक (४३.२), हरयाणा (३९.८).
सर्वात स्वस्त पाच राज्ये (आकडे हजारात) हिमाचल प्रदेश (२३.६), बिहार (२५.९), ओडिशा (२६.४), झारखंड (२८.३), पुडूचेरी (२८.४).
संदर्भ - फिनशॉट