'या' ठिकाणी मिळते सोन्याची मिठाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 16:48 IST2018-08-22T16:39:44+5:302018-08-22T16:48:14+5:30

गुजरातमध्ये अनेक मिठाईची दुकाने आहेत. मात्र, सध्या एक मिठाईचे दुकान खूप चर्चेत आहे. 24 कॅरेट मिठाई मॅजिक असे या दुकानाचे नाव आहे.
या दुकानात मिळणारी मिठाई पाहून तुम्हाला धक्काच बसेल. असे सांगण्यात येते की, या दुकानातील मिठाई 9,000 प्रतिकिलो मिळते.
या महागड्या मिठाईचं नाव गोल्ड स्वीट आहे.
या मिठाईला चांदीच्याऐवजी सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे.
ही मिठाई सूरत शहरात लोकांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे.
या दुकानात चांदीच्या वर्खाच्या मिठाईही ठेवण्यात आल्या आहेत ज्यांची किंमत प्रतिकिलो 600 रूपयांपासून 1000 रूपयांपर्यंत आहे.