... म्हणून गुजरातमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' आहे खास By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 02:31 PM 2018-10-31T14:31:19+5:30 2018-10-31T16:23:02+5:30
जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' साकारण्यात आले आहे.
'व्हॅली ऑफ फ्लॉवर' हे 250 एकरच्या विस्तीर्ण परिसरात साकारण्यात आलं असून त्यामध्ये तब्बल 102 प्रजातीची झाडं लावण्यात आली आहेत.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या प्रेक्षक गॅलरीतून परिसर नयनरम्य दिसावा यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे.
'व्हॅली ऑफ फ्लॉवर' मध्ये वेगवेगळ्या आकाराचे सुंदर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. या सेल्फी पॉईंटवर पर्यटकांना सुंदर फोटो काढण्याचा आनंद घेता येणार आहे.
'व्हॅली ऑफ फ्लॉवर' मध्ये अनेक दूर्मिळ प्रजातीची झाडं आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासोबत ही सुंदर जागा पर्यटकांना आकर्षित करणार आहे.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' सोबतच थ्री स्टार हॉटेल, म्युझियम, ऑडिओ-व्हिज्युअल गॅलरीदेखील गुजरातमध्ये उभारण्यात आली आहे.