गुजरात दंगल : 9 तासांच्या चौकशीत मोदींनी साधा चहासुद्धा घेतला नाही
By महेश गलांडे | Updated: October 28, 2020 15:43 IST2020-10-28T15:35:28+5:302020-10-28T15:43:24+5:30

गुजरात 2002 च्या दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एसआयटी पथकाने तब्ब्ल 9 तास चौकशी केली होती.
याप्रकरणी नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख आर. के. राघवन यांच्या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले, त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार, या 9 तासांच्या चौकशीत मोदींनी एक कपभरही चहा घेतला नाही.
गुजरात दंगल प्रकरणावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, त्यांना गांधीनगर येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
मोदींनी चौकशीला हजर राहताना आपल्यासोबत एक पाण्याची बाटली आणली होती.
या 9 तासांच्या चौकाशीत मोदींनी ना चहा घेतला, ना नाश्ता. केवळ पाणी घेतले.
राघवन यांच्या 'अ रोड वेल ट्रॅव्हल्स' या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात दंगल प्रकरणी एसआयटी पथकाची नेमणूक करण्यात आली होती
या पथकाचे नेतृत्व राघवन यांच्याकडे होते, त्यांनी सीबीआयचे संचालक असताना बोफार्स घोटाळा, चारा घोटाळा, भारत vs द. आफ्रिका सामन्यात फिक्सिंग प्रकरणी चौकशी केली होती.
मुख्यमंत्री असल्याने मोदींना कार्यालयात बोलवायचे कसे हा प्रश्न होता, पण एका अधिकाऱ्यामार्फत विचारणा केली, त्यावर मोदींनी तत्काळ होकार दिला.
याप्रकरणी चौकशीची जबाबदारी मी पथकातील सहकारी अशोक मल्होत्रा यांच्याकडे दिली होती.
मी स्वतः चौकशी केली असती तर, प्रश्नचिन्ह आणि संशय निर्माण झाला असता, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचे राघवन यांनी म्हटलं.
मोदींना 9 तासांच्या चौकशीत 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर टाळले नाही, शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे मोदींनी दिल्याचे राघवन यांनी लिहिले आहे.
मोदींना विश्रांतीसाठीही विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी नकार दिला. शेवटी मल्होत्रा यांना विश्रांती हवी असल्याने मोदींनीही काही मिनिटांसाठी विश्रांती घेतली.
याप्रकरणी मोदींसह 63 जणांना एसआयटीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे.