ट्रुडोंच्या चिरंजीवांच्या या बाललीला पाहिल्यात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:14 IST2018-02-27T16:14:08+5:302018-02-27T16:14:08+5:30

काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलेही त्यांच्यासोबत होती.

ट्रुडो यांचा मुलगा हॅड्रिन यावेळी चांगलाच चर्चेचा विषय ठरला. सामान्य व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या मुलांमध्ये फारसा फरक नसतो, हेच हॅड्रिनच्या वागण्यातून दिसून आले.

राष्ट्रपती भवन असो वा राजघाट प्रत्येक ठिकाणी हॅड्रिन महाशयांची स्वारी आपल्याच नादात वावरत होती.

देशाचे पंतप्रधान म्हटले की त्यांच्या मुलांना परदेश दौऱ्यांवर प्रोटोकॉलनुसार वागावे लागत असेल, असा आजपर्यंत अनेकांचा समज होता. मात्र, हॅड्रिनने हे सगळे समज मोडीत काढले.

राजघाटावर श्रद्धांजली देण्यासाठी ट्रूडो फॅमिली गेली तेव्हा तिथे हॅड्रिनच्या खटाळ्यपणाने सगळ्यांनाच हसू फुटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही हॅड्रिन बिनधास्तपणे वावरत होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही हॅड्रिन बिनधास्तपणे वावरत होता.

प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी हॅड्रिनचा अवखळपणा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

ट्रूडो यांनी ताजमहालपासून साबरमती आश्रमाचा दौरा केला. प्रत्येक ठिकाणी हॅड्रिनचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आता त्याचे फोटो इंटरनेटवर आणि सोशल मीडियामध्ये चर्चेत आहेत.