Narendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:24 PM2019-09-17T12:24:33+5:302019-09-17T12:35:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (17 सप्टेंबर ) आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जंगी तयारी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत कामामध्ये व्यस्त असतात. काम करताना पंतप्रधान मोदींचा उत्साह पाहून तरुण पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते.

पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन आहेत. मोदींच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेऊया.

मोदी रोज सकाळी 5 वाजता उठतात. साधारण 8 तासांची झोप आरोग्यासाठी चांगली असते असा डॉक्टर नेहमी सल्ला देतात. मात्र मोदी 24 तासांमध्ये केवळ 3 ते 4 तासांची झोप घेतात.

पंतप्रधान मोदी न चुकता दररोज नियमितपणे योगा करतात. सूर्य नमस्कार, प्राणायम आणि योगासन हे त्यांच्या एनर्जी आणि फिटनेसमागचं रहस्य आहे.

सूर्य नमस्कार, प्राणायम आणि योगासनामुळे तणाव दूर होतो तसेच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. मोदी नेहमी आपल्या भाषणांमधून तरुण पिढीला फिट राहण्यासाठी प्रेरणा देतात.

व्यायामासोबतच निरोगी आयुष्यासाठी आहारही महत्त्वाचा असतो. मोदी हेल्दी ब्रेकफास्ट करतात. त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये पोहे, खाखरा, आल्याचा चहा अशा गोष्टींचा समावेश असतो.

पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत. लंच आणि डिनरमध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. तसेच साधं गुजराती आणि साऊथ इंडियन जेवण त्यांना आवडतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने दिलेलं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पूर्ण केलं होतं. 1 मिनिट 49 सेकंदाचा व्हिडीओ त्यांनी बुधवारी (13 जून 2018) ट्विटरवर शेअर केला होता.

'पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो. त्यामुळे मला खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते' असं ट्विट त्यावेळी मोदींनी केलं होतं.