लुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 15:53 IST2018-08-21T15:25:57+5:302018-08-21T15:53:48+5:30

हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेणे प्रत्येकालाच आवडतं. अनेक हॉटेल्सही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे आजमावत असतात. असंच एक हवाईसफर घडवणारे हॉटेल लुधियानामध्ये आहे.
लुधियानामध्ये एका खऱ्या विमानात सुंदर हॉटेल तयार करण्यात आले आहे. ‘हवाई अड्डा’ असं या हॉटेलचं नाव असून अनेक पर्यटक या हॉटेलला आवर्जून भेट देतात.
पंजाबच्या लुधियाना शहरात असलेलं हे हॉटेल भारतातील पहिलं प्लेन रेस्टॉरन्ट आहे.
लोकांना आकर्षित करणारं हे हॉटेल एका जुन्या विमानापासून तयार करण्यात आलं आहे.
प्लेन रेस्टॉरन्ट ही अद्भुत संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी परमजित सिंह लुथरा यांचा मोलाचा वाटा आहे.
महाराजा एक्स्प्रेसला पाहून त्यांना प्लेन रेस्टॉरन्ट तयार करण्याची कल्पना सुचली.
‘हवाई अड्डा’ या हॉटेलमध्ये बेकरी, कॅफे आणि एक पार्टी हॉलही आहे. या हॉटेलमध्ये केवळ शुद्ध शाकाहारी भोजन मिळतं.