हेड कॉन्स्टेबलचा मुलगा IPS तर शिपायाचा मुलगा झाला DM; संघर्षाची कहाणी तुम्हालाही करेल भावुक By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 12:37 PM 2022-12-04T12:37:47+5:30 2022-12-04T12:45:35+5:30
UPSC Success Story: जीवनाच्या शर्यतीत प्रत्येकाला वाटेतील अडचणींचा सामना करून पुढे जायचे असते. परंतु सर्वांनाच हे प्रगतीचे शिखर गाठता येत नाही. पण काही मेहनती आणि कष्टाळू मुले असतात जी आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी गरूडझेप घेऊन जगासमोर एक आदर्श ठेवतात. वाराणसीमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर असलेले कुबेर नाथ मिश्रा २००३ मध्ये निवृत्त झाले. ज्या वर्षी ते निवृत्त झाले, त्याच वर्षी त्यांच्या मुलाने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. कुबेरनाथ यांचा मुलगा अजय कुमार मिश्रा याने इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ७ वर्ष सेवा दिली. यादरम्यान तो मैनपुरी, सुलतानपूर, कांपूर आणि वाराणसीचा कप्तान राहिला आहे. २००३ बॅचचे आयपीएस अधिकारी अजय मिश्रा हे गाझियाबादचे पहिले पोलीस आयुक्त आहेत.
झारखंडच्या रामगढ येथील सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या सुमित्रा देवीं यांच्या मुलाने प्रगतीचे शिखर गाठले. आईच्या मेहनतीतून आणि त्यागातून त्या महिलेच्या तीन मुलांना खूप काही शिकायला मिळाले. खरं तर आता सुमित्रा देवी यांची तिन्ही मुले यशस्वी झाली आहेत. मोठा मुलगा वीरेंद्र कुमार हा रेल्वेत इंजिनिअर आहे. मधला मुलगा धीरेंद्र डॉक्टर आहे आणि धाकटा मुलगा महेंद्र कुमार आयएएस अधिकारी आहे. मुलांनी एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही आईने अद्याप आपली नोकरी सोडली नव्हती. सुमित्रा यांची तिन्ही मुले आपल्या आईच्या निवृत्तीच्या दिवसाला अविस्मरणीय करण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये गेली. फोटोमध्ये सुमित्रा या आपल्या मुलांसोबत बसलेल्या दिसत आहे.
जेसी प्रशांती हे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात डीएसपी म्हणून तैनात होते. याचदरम्यान त्याच्या वडिलांची सर्कल इन्स्पेक्टर म्हणून पोस्टिंग सुरू होती. जेसी यांच्या वडीलांनी त्यांना सलाम केला तेव्हा त्यांच्यासाठी तो खूप भावनिक क्षण होता. वडिलांचे स्वप्न पूर्ण करून मुलीने आपल्या वडिलांचे नाव रोशन केले. २०२१ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोने अनेकांना भुरळ घातली होती.
२०१४च्या बॅचचे आयपीएस अनूप सिंग हे २०१८ मध्ये लखनौमध्ये एसपी म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांच्या वडिलांचे स्वप्न साकार झाले. अनूप यांचे वडील जनार्दन सिंह हे लखनौमध्ये पोलीस हवालदार आहेत. त्यांचा मुलगा अधिकारी झाला तेव्हा वडील म्हणायचे 'तो माझा मुलगा नंतर आहे, आधी तो अधिकारी आहे'. मी देखील त्याला नमस्कार करीन आणि त्याच्या आदेशाचे पालन करीन.
आयएएस रमेश मीना यांना जेव्हा त्यांच्या मुलींनी UPSC उत्तीर्ण झाल्याबद्दल कळले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या दोन्ही मुलींनी त्यांच्याप्रमाणेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये शिक्षण घेतले. त्यांच्या दोन्ही मुली अनामिका (२९) आणि अंजली (२६) यांनी UPSE मध्ये चांगले गुण मिळवले. अनामिका यांना ११७ तर अंजली यांना ४४९ रॅंक मिळाली आहे.
भारतीय वायुसेनेचे एअर कमांडर संजय शर्मा यांच्या मुलीने वडिलांसोबत फायटर प्लेनमधून उड्डाण केले तेव्हा तो इतिहास बनला. संजय शर्मा यांची मुलगी अनन्या शर्मा हिला सुरुवातीपासूनच वडिलांप्रमाणे फायटर कमांडर बनायचे होते.