देवाक काळजी रे माझ्या...हे हृदय पिळवटून टाकणारे फोटो पाहून,तुमचेही डोळे पाणावतील !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 05:50 PM2020-05-18T17:50:42+5:302020-05-18T18:08:37+5:30

देशभरातील कामानिमित्त शहरी भागात गेलेले मजूर, कामगार लॉकडाऊनमुळे आपल्या गावी निघाले आहेत. रस्त्यावर या मजुरांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. हाताला काम नाही, मग खायचं काय या चिंतेत असलेल्या या मजुरांनी अखेर घरचा रस्ता धरला.

चालून थकलेल्या एका लहान लेकराला त्याच्या आईने सूटकेसवर ठेवलं आणि सुटकेसला एक दोरी बांधून त्याला ओढत असतानाचा हा फोटो समोर येताच चिमुरड्याचे होणारे हाल पाहून कोणाचेही मन दुखेल.

अजून किती अंतर असं या कुटुंबाला पार करायचे आहे, याची कल्पनाही कोणाला नाही.

आपल्या गावी पोहचण्यासाठी मिळेत तो पर्याय शोधत अनेकजण आपल्या घरी पोहचले.

उन्हा तान्हात आपल्या लहान लेकरांसह निघालेले हे मजुरांच्या वाट्याला आलेला संघर्ष पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

मदतीसाठी कोणही पुढे येईन, माणुसकीच्या नात्यानेही कोणीही पुढे येईना, तरीही सुरू होता संघर्ष

वाहतुकीची सोय नसल्याने पायी शेकडो किलोमीटरचं अंतर कापण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. मात्र त्यांच्या हा प्रवास खडतर आणि वेदनादायी होता.

आपल्या लहानग्यांना कडेवर, खांद्यावर बसवत मिळेल त्या मार्गानं फक्त घरी गाठण्यासाठी मजूरांची सुरू होती धडपड.

अशा प्रकारे कोणी पाणी देतंय, तर कोणी जेवण सेवाभावी संस्थांनी पुढे येत दिला मदतीचा हात.

रस्त्याच्या कडेला थांबत भुकेल्या चिमुकलीला माऊली भरवत असताना.

सायकलवर पिशवी, पिशवीत बसवली होती लेक आणि सूरू होता प्रवास परतीचा.

मात्र वाहतुकीची सोय नसल्याने पायी शेकडो किलोमीटरचं अंतर कापण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. मात्र त्यांच्या हा प्रवास खडतर आणि वेदनादायी होता.

चालून चालून थकल्याने उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्याआधी या लोकांनी रस्त्यावरच पाठ टेकलेली ठिकठिकाणी पाहायला मिळत होती.

अर्ध्या रस्त्यात पैसे संपल्याने 15 हजारांचा बैल 5 हजारांत विकून पंधरा वर्षांच्या मुलाला बैलगाडीला जुंपण्यात आले होते.

एक वर्षीय मुलाला मृत्यूपूर्वी पाहता आलं नाही, हे दु:ख रामपुकारला सतावत आहे. ज्यावेळी हा फोटो काढलाय त्यानंतर काही वेळाने रामपुकारच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

Read in English