हिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी, रस्त्यांवर पसरली बर्फाची चादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 15:23 IST2019-02-19T15:20:53+5:302019-02-19T15:23:42+5:30

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होतेय.

हिमाचल प्रदेशच्या किन्नोर, कुल्लू, मनाली, रोहतांगमध्ये बर्फवृष्टीमुळे चादर पसरली आहे.

बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

तसेच रस्त्यांवर बर्फाची चादर पसरल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

बर्फवृष्टीमुळे पारा बऱ्याच अंश खाली घसरला असून, वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहे.

बर्फवृष्टीमुळे रस्ते, झाडांवर बर्फच पसरला असून, वातावरण आल्हाददायक आहे.