हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी, रस्त्यावर बर्फाची चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:29 PM2018-12-28T16:29:28+5:302018-12-28T16:35:23+5:30

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातही बर्फवृष्टी झाली आहे.

हिमाचल प्रदेशातील शिमल्यात, तर उत्तराखंडमधल्या मुनस्यारीमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमान उणे चार अंशांवर गेलं आहे.

बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

मुनस्यारीच्या पर्वतराजीत बर्फवृष्टी होत आहे. डेहराडूनही तापमान फारच खाली आले आहे.

रस्त्यावर बर्फाची चादर पसरल्याचं सगळीकडे चित्र आहे. पर्वतराजीत अनेक ठिकाणी बर्फाचे कडे कोसळले आहेत.

तसेच बर्फवृष्टीमुळे महामार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. रस्ते बंद झाल्यामुळे सिमला आणि किन्नोरच्या काही भागाचा संपर्क तुटला होता.