हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 14:43 IST2019-12-13T14:37:42+5:302019-12-13T14:43:14+5:30

हिमाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली. येथील स्थानिक लोक आणि पर्यटकांना बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे.
कुलू, लाहैल-स्पिती आणि किन्नौर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे रस्ते निसरडे झाले आहे.
अनके पर्यटक ठिक-ठिकाणी अडकून पडले आहेत. आणखी काही दिवस बर्फवृष्टी सुरूच राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतो आहे.
समुद्रसपाटीपासून दहा हजार उंचीवर असणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू आहे. मंडीमधला कामरुनाथ तलाव देखील गोठला आहे.
बर्फवृष्टीमुळे येथील वातावरण बदलले आहे. त्यामुळे येथील पर्यटकांना एक वेगळे चित्र अनुभवायला मिळत आहे.
बर्फवृष्टी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे.
वातावरणातील बदल, बर्फवृष्टी अशी एकंदर परिस्थिती पाहता सध्याच्या घडीला येथील प्रशासनाकडून स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.