Here is the price of a thali in Indian states
देशात कुठे मिळतं सर्वात स्वस्त जेवण? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:28 PM2020-02-05T15:28:04+5:302020-02-05T15:32:06+5:30Join usJoin usNext अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला. त्यातून देशात सर्वात स्वस्त आणि महाग जेवण कुठे मिळतं, याची आकडेवारी समोर आली. झारखंडमध्ये सर्वात स्वस्त जेवण मिळतं. झारखंडमध्ये ५० रुपयांच्या आत एक व्हेज थाळी मिळते. ५० च्या आत जेवणाची थाळी मिळणारं झारखंड देशातलं एकमेव राज्य असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो. राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एका व्हेज थाळीसाठी ५० ते ७५ रुपये मोजावे लागतात. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशामध्येही एक थाळी ५० ते ७५ रुपयांना मिळते. केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये एका शाकाहारी ताटासाठी ७५ ते १०० रुपये लागतात. बंगाल, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाममध्येही एका व्हेज थाळासाठी ७५ ते १०० रुपये मोजावे लागतात. पंजाब, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेशातही एका ताटासाठी ७५ ते १०० रुपये द्यावे लागतात. बिहार आणि त्रिपुरामध्ये एका व्हेज थाळीसाठी १०० पेक्षाही जास्त रुपये मोजण्याची तयारी हवी.