Heavy Rain : दिल्लीत 12 वर्षातील सर्वाधिक पाऊस, आनंद अन् माणूसकीही दिसली By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:50 PM 2021-09-01T16:50:18+5:30 2021-09-01T17:26:02+5:30
Heavy Rain : जोरदार पावसामुळे अनेक राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीत सप्टेंबर महिन्यातील गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे. देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असून देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
जोरदार पावसामुळे अनेक राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीत सप्टेंबर महिन्यातील गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे.
दिल्लीतील पावसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, अनेकजण पावसापासून आपले संरक्षण करताना दिसत आहेत, तर काहीजण या पावसाचा आनंद घेत आहेत.
दिल्लीच्या विविध भागात या मुसळधारा पावसामुळे पाणी साठले आहे. गेल्या 24 तासांत 112.1 मिमि पाऊस दिल्लीत पडला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत पावसाचा महिन्यातील 90 टक्के कोटा पूर्ण झाला आहे. सफदरजंग परिसरात सकाळी 8.30 वाजेपर्यंत 112.1 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी वाहनांसाठी नियमावली जाहीर केली असून पावसामुळे नागरिकांना अलर्टही जारी केला आहे.
दिल्लीच्या रस्त्यांवरही पाणीच पाणी दिसून येत आहे. रिक्षाचालक, सायकलचालक पाण्यांमधून मार्ग काढत आहेत
चारचाकी वाहनांनाही पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली आहे.
दिल्लीच्या पब्लीक ट्रान्सपोर्ट पकडताना दिल्लीकरांची मोठी दमछाक झाली, पावसाच्या पाण्यातून बस पकडताना प्रवासी दिसत आहेत
काही दिल्लीकरांनी या पावसाचा आनंद घेतला आहे, पावसाच्या पाण्यात पायांनी फुगा उडवताना या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद आपलेही मन खुलवणारा ठरतो.
रात्रीच्या अंधारात दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रकाशाच्या सहाय्याने पावसाच्या संतत धारेत वाट शोधावी लागली
दिल्लीच्या पावसातही माणूसकीचे दर्शन घडले, रिक्षाचालकाच्या डोक्यावर छत्री ठेऊन पॅसेंजरने मनाचा मोठेपणा अन् मानवता जपली