The highest temperature in India's 'this' place
भारतातील 'या' ठिकाणी असतं सर्वाधिक तापमान By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 04:01 PM2018-08-27T16:01:57+5:302018-08-27T16:24:03+5:30Join usJoin usNext भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी असून हा भारतातील सर्वाधिक तापमान असलेल्या भागांपैकी एक आहे. भुवनेश्वर येथील तापमान अधिक असल्याने प्रचंड गरम होतं. आंध्रप्रदेशमधील तिरुपती हे अत्यंत महत्वाचं ठिकाण असून येथील तापमान हे 47 डिग्रीपर्यंत असतं. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. राजस्थानातील राजगडमध्ये वाळवंटजवळ असल्याने तापमान अधिक असते. या भागाचं तापमान 50 डिग्रीपेक्षाही अधिक असतं. अहमदाबाद हे गुजरातमधील अत्यंत महत्वपूर्ण शहर असून उन्हाळ्यात येथील तापमान हे अधिक असते. नागपूर हे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर असून येथील तापमान हे जास्त असते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. डालटनगंज हे झारखंडमधील जास्त तापमान असलेलं ठिकाण आहे. कोयल नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचं तापमान हे 50 डिग्रीपर्यंत असतं. टॅग्स :प्रवासTravel