Himachal Pradesh predicts deteriorating weather, rainfall and snowfall
हिमाचलमध्ये पुन्हा बिघडणार हवामान, पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:23 PM2020-02-03T22:23:25+5:302020-02-03T22:25:49+5:30Join usJoin usNext हिमाचल प्रदेशमधल्या किन्नोर जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळे पूर्ण परिवहन व्यवस्था कोलमडून पडली होती. पण अजूनही ही व्यवस्था रुळावर आलेली नाही. किन्नोरमधल्या अर्ध्या डझनांहून रस्ते अजूनही बर्फाखाली झाकलेले आहेत. जिल्ह्यात अनेकांना पायीच प्रवास करावा लागत आहे. तसेच इतर ग्रामीण भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमधले रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. शिमला, सोलन, सिरमोर, मंडी, कुल्लू, चंबा, किन्नोर आणि लाहोल स्पितीमधलं हवामान खराब राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लाहोल स्पितीमध्येही रस्ते बंद झाल्यानं हेलिकॉप्टरच्या द्वारे नागरिकांना मदत पुरवली जात आहे. लाहोल स्पितीसाठी तीनदा उड्डाणं केली आहेत. अनेक रुग्णांना या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं शहरातील रुग्णालयात हलवण्यात येत आहे.