अगदी मोफत! आधार केंद्र उघडा अन् करा बक्कळ कमाई, फ्रँचायजी कशी मिळवाल? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:15 PM 2021-12-31T18:15:01+5:30 2021-12-31T18:20:07+5:30
Aadhaar Card Franchise Application Process: तुम्ही जर आधार कार्ड सेंटर सुरू करण्याचा विचार करत असाल आणि यासाठी नेमकं काय करावं लागतं याची माहिती तुम्हाला नसेल तर पुढील माहिती तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी ठरणार आहे. आधार कार्ड सेंटरची फ्रँचायजी अगदी मोफत कशी मिळवायची आणि त्यातून कमाई कशी सुरू करता येईल याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड सेंटरची फ्रँचायजी घेण्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. याशिवाय तुम्ही आधार कार्ड सेंटर सुरू करू शकत नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) परीक्षा आयोजित करण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आधार सर्व्हीस सेंटर सुरू करण्यासाठीचा परवाना देण्यात येतो.
यात तुम्हाला आधार एनरॉलमेंट आणि बायोमॅट्रीक पडताळणी करण्याची मान्यता संबंधित सेवा केंद्राला मिळते. यानंतर तुम्हाला कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं.
अर्ज कसा कराल? सर्वात आधी https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर Create New User वर क्लिक करा. तिथं तुम्हाला कोड शेअर करण्यास सांगितलं जाईल. Share Code साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc या लिंकवर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करा.
त्यानंतर तुम्हाला XML File आणि Share Code उपलब्ध होईल. आता अर्ज दाखल करण्याची माहिती देणाऱ्या विंडोवर पुन्हा या आणि फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य पद्धतीनं भरा. त्यानंतर तुमच्या फोन आणि ई-मेलवर ID आणि Password येईल.
User ID आणि password च्या माध्यमातून Aadhaar Testing and Certifivation या पोर्टलवर लॉगइन करा. इथं तुम्हाला एक फॉर्म उपलब्ध होईल तो भरा. त्यावर तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा. Proceed to submit form पर्यायवर क्लिक करा. शेवटी तुम्हाला शुल्क भरावं लागेल. यासाठी वेबसाईटच्या Menu पर्यायावर क्लिक करा आणि पेमेंट पर्यायावर क्लिक करुन शुल्क भरावं लागेल.
सेंटर बुक करण्याची प्रक्रिया फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन दिवस वाट पाहावी लागेल. त्यानंतर पुन्हा संकेतस्थळावर लॉगइन करा आणि Book Center पर्यायावर क्लिक करा. नजिकचं कोणतंही सेंटर निवडा आणि परीक्षेसाठीचा वेळ, तारीख निवडा. Admit Card डाऊनलोड करा व ठरलेल्या दिवशी वेळेवर परीक्षेसाठी सेंटरवर पोहोचा.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काय करायचं? परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सेंटरची फ्रँचायजी सुरू करण्याची परवानगी मिळून जाईल. यातून तुम्ही देणार असलेल्या सेवेबाबत ग्राहकांकडून शुल्क आकारू शकता आणि यातून तुमच्या कमाईला सुरुवात होईल.
फ्रँचायजी अगदी मोफत मिळते. यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. अर्थात आधार सेंटर उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक पातळीवर गुंतवणूक करावी लागेल. कारण यासाठी तुम्हाला एक ऑफिस, संगणक, इंटरनेट इत्यादींची पायाभूत सुविधांची गरज असणार आहे.