Ram Mandir: बांधकाम पूर्ण झाल्यावर कसं दिसेल अयोध्येतील राम मंदिर, किती काम झालं पूर्ण, समोर आले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 12:31 PM 2022-10-16T12:31:26+5:30 2022-10-16T12:36:03+5:30
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरू आहे. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचं सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच मंदिराच्या बांधकामाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामधून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येतो. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरू आहे. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचं सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच मंदिराच्या बांधकामाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामधून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येतो.
राम मंदिराच्या बांधकामासाठी १८०० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच मंदिराचं बांधकाम २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर राम मंदिरामध्ये जानेवारी २०२४ मध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे.
राम मंदिराच्या बांधकामासोबतच अयोध्येच्या सौंदर्यीकरणाचं कामही वेगाने सुरू आहे. त्यामध्ये रत्यांचं रुंदीकरण आणि चौकांची नव्याने बांधणी सुरू आहे.
ट्रस्टकडून रामभक्तांना मंदिराच्या बांधकामाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी काही फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या भव्य राम मंदिरामध्ये एकूण १२ दरवाजे असतील. हे सर्व दरवाजे सागौनच्या लाकडाचे असतील. जानेवारी २०२४ पासून भक्तांना भव्य गर्भगृहामध्ये रामलल्लांचं दर्शन मिळण्यास सुरुवात होईल.
मंदिराच्या गर्भगृहामध्ये १६० स्तंभ असतील. ते मंदिराचा आधार असतील. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर १३२ स्तंभ आणि दुसऱ्या मजल्यावर ७४ स्तंभ असतील.
राम मंदिराच्या निर्मितीचं सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झालं आहे. रामलल्लांच्या गर्भगृहाच्या निर्मितीच्या कामाला वेग आल्याचं दिसत आहे. अष्टकोनीय गर्भगृहामध्ये आतापर्यंत ५०० भव्य दगड लावण्यात आले आहेत. तसेच गर्भगृहाच्या बांधकामासाठी सुमारे ५०० मजूर आणि कारागिर काम करत आहेत.