Husband-Wife Relationship: महिला का नाकारतात लैंगिक संबंध? पतीराजांचे म्हणणे काय? नाजूक विषयावर देशाचा सर्व्हे आला... By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:22 AM 2022-05-11T08:22:30+5:30 2022-05-11T08:40:36+5:30
काय सांगतो राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल? पती-पत्नीमधील लैंगिक संबंध हा भारतीय समाजातील अतिशय नाजूक विषय या विषयावर खुलेआमपणे बोलण्यास कोणी सहजासहजी तयार होत नाही. पती-पत्नीमधील लैंगिक संबंध हा भारतीय समाजातील अतिशय नाजूक विषय या विषयावर खुलेआमपणे बोलण्यास कोणी सहजासहजी तयार होत नाही. विशेषत: ग्रामीण वा निमशहरी भागात यावर सोयिस्कर मौन बाळगले जाते. शहरे वा महानगरांमध्ये मात्र परिस्थिती वेगळी असते. स्त्री-पुरुष समानतेमुळे येथे सर्व खुलेपणा असतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालात यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे.
८२% विवाहित महिला पतीस प्रसंगी लैंगिक संबंध नाकारू शकतात. या नकाराधिकारात गोव्यातील महिला सर्वात पुढे असून अरुणाचल प्रदेशातील महिला मागे आहेत. जम्मू-काश्मिरातील महिलाही याबाबतीत किंचित मागासलेल्या आहेत. त्यांना हा नकाराधिकार प्रभावीपणे वापरता येत नाही.
सर्वेक्षणात प्रथमच... १९९२-९३ पासून राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण सुरु झाले. या सर्वेक्षणात प्रथमच विवाहितामधील लैंगिक संबंध हा विषय हाताळण्यात आला.
पुरुषांचे म्हणणे काय? पतीशी लैंगिक संबंध ठेवण्यास पत्नीला असलेल्या नकाराधिकाराशी ७२ टक्के पुरुषांनी सहमती दर्शवली.
पत्नीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तिला मारहाण करणे, तिच्यावर जबरदस्ती करणे किंवा तिला खर्चासाठी पैसे न देणे इत्यादी प्रकार पती करू शकतो का, यावर केवळ सहा टक्के पुरुषांनीच होकार दिला. अन्यांनी त्यास नकार दर्शवला.
गर्भनिरोधके वापरणे हे महिलांचे कर्तव्य आहे, असे ३२% पुरुषांना वाटते.
सर्वेक्षण कधी करण्यात आले? कुटुंब आरोग्य सर्वेक्षण दोन टप्प्यांत करण्यात आले. पहिल्या टप्पा १७ जून २०१९ ते ३० जानेवारी २०२० या काळात १७ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.
दुसरा टप्पा २ जानेवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत पार पडला. त्यात ११ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होता.
सेक्ससाठी नकार देण्याची तीन मुख्य कारणे... लैंगिक संबंध नाकारण्यामागे काही कारणे आहेत. यामध्ये तिला किंवा त्याला यौन संबंधी रोग असेल तर, दुसरे कारण पतीचे दुसऱ्या महिलेशी शारीरिक संबंध असतील तर किंवा तिसरे कारण म्हणजे त्यांची इच्छा नसेल तर. या कारणांमुळे महिला सेक्ससाठी नकार देईल, यावर ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरुष सहमत नाहीत.
मारहाण का होते? त्याची कारणे.... त्याचवेळी आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे की 45% स्त्रिया आणि 44% पुरुष असे मानतात की या कारणांनी नवऱ्याची पत्नीला होणारी मारहाण मान्य आहे. यामध्ये न सांगता बाहेर गेलात तर, घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष करणे, पतीसोबत वाद, सेक्स करण्यास नकार, अन्न नीट न शिजवणे, लफडे असल्याचा संशय, सासरचा अनादर ही कारणे आहेत.