An IAF Mi-17V5 helicopter Crash with CDS Gen Bipin Rawat on board
हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरकाप उडवणारे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:38 PM2021-12-08T14:38:59+5:302021-12-08T14:44:45+5:30Join usJoin usNext तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत यांच्या पत्नीही होत्या. सदर घटनेत ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. घटनेत ३ गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हवाई दलाचे हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते. सीडीएस जनरल बिपीन रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.टॅग्स :बिपीन रावतभारतीय जवानहेलिकॉप्टर दुर्घटनाBipin RawatIndian ArmyHelicopter Crash