जाणून घ्या दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या मिराज 2000 विमानांची खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 09:40 PM 2019-02-26T21:40:52+5:30 2019-02-26T21:49:14+5:30
भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते. Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे.
हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करुन त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.
‘मिराज 2000’ लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमानांचा मोठ्याप्रणात वापर करण्यात आला होता.
‘मिराज 2000’ विमानाची लाबी 47 फूट आहे. वजन जवळपास 7500 किलो इतके आहे. 2336 किमी प्रतितास स्पीड आहे. तर 125 राउंड गोळ्या प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे.
तसेच, 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला आणि अचूक लक्ष अचूक साधण्याची क्षमता या विमानामध्ये आहे.