शाब्बास पोरा! वडील रिक्षा चालक, आईचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू; पण 'तो' खचला नाही, झाला IAS By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 03:12 PM 2023-02-28T15:12:33+5:30 2023-02-28T15:20:00+5:30
IAS Govind Jaiswal : काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. IAS, IPS व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. आयएएस अधिकारी गोविंद जयस्वाल यांच्या यशामध्ये त्यांचे वडील आणि बहिणींचा मोठं योगदान आहे.
गोविंद यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांचे वडील नारायण जयस्वाल यांनीही अनेक त्याग केले आणि संघर्षाची नवी कथा लिहिली. 2006 बॅचचे आयएएस अधिकारी गोविंद जयस्वाल यांची यशोगाथा जाणून घेऊया...
2005 साली IAS गोविंद जयस्वाल यांच्या आई इंदू यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. गोविंदचे वडील एका रिक्षा कंपनीचे मालक होते आणि त्यांच्याकडे 35 रिक्षा होत्या. बायकोच्या उपचारासाठी बहुतेक रिक्षा विकून ते गरीब झाले. त्यावेळी गोविंद सातवीत होता.
अनेकवेळा गोविंद, त्याच्या तीन बहिणी आणि वडील सुकी भाकरी खाऊन वेळ काढत. गोविंदच्या वडिलांनी आपल्या चार मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. त्यावेळी गोविंदचे संपूर्ण कुटुंब काशीच्या अलईपुरा येथे 10/12 च्या खोलीत राहत होते. त्यांनी आपल्या तीन पदवीधर मुलींच्या लग्नासाठी उरलेल्या रिक्षाही विकल्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदच्या घरातील काही सामान अजूनही त्या खोलीत ठेवण्यात आले आहे आणि ते त्याचे भाडे देतात. गोविंद जयस्वाल यांनी सुरुवातीचे शिक्षण उस्मानपुरा येथील सरकारी शाळेत केले. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथील हरिश्चंद्र विद्यापीठातून मॅथमध्ये ग्रॅज्युएशन केले.
2006 मध्ये, गोविंद यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला आले. गोविंदला पॉकेटमनी पाठवण्यासाठी त्याच्या वडिलांनी सेप्टिक आणि पायाला जखम असूनही रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.
गोविंदला पैसे पाठवण्यासाठी त्याचे वडील अनेकवेळा जेवण टाळायचे. त्यांच्या जखमेवर उपचारही झाले नाहीत. त्याचवेळी गोविंदही दिल्लीला गेला होते. पण त्यांनी कोचिंग लावले नाही. तिथल्या मुलांना तो ट्युशन शिकवायचा.
पैसे वाचवण्यासाठी त्यांनी एक वेळ टिफिन आणि चहा बंद केला होता. 2007 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 48 वा क्रमांक मिळवला. गोविंद जयस्वाल यांनी प्रेमविवाह केला होता, असे अनेकांना वाटते. पण ते खरे नाही.
पत्नी चंदना या आयपीएस अधिकारी आहेत आणि दोघांचे अरेंज मॅरेज झाले आहे. हे नाते गोविंद यांच्या मेहुण्याने निश्चित केले होते. चंदनाची आजी गोविंदला भेटायला आली होती. चंदनाच्या घरच्यांना गोविंदचे कुटुंब खूप आवडले.
गोविंद आणि चंदना या दोघांचे लग्न झाले. बॉलिवूडही गोविंदच्या संघर्षमय आयुष्यातून प्रेरित झालं असून त्यावर एक चित्रपट तयार करत आहे. 'दिल्ली अब दूर नही' असं या चित्रपटाचं नाव ठेवलं आहे. 12 मे 2023 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
(सर्व फोटो - सोशल मीडिया)