Income tax department raid, officials found a scam in delhi NCR
आयकर विभागाचा छापा, अधिकाऱ्यांना सापडलं मोठं घबाड By महेश गलांडे | Published: October 27, 2020 11:39 AM2020-10-27T11:39:04+5:302020-10-27T16:30:55+5:30Join usJoin usNext दिल्ली आयकर विभागाच्या पथकाने दिल्ली एनसीआर, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथील तब्बल 42 ठिकाणी छापा मारला. आयकर विभागाने या धाडीत मोठं घबाड हस्तगत केलं आहे. विभागाच्यावतीने आत्तापर्यंत टाकलेल्या छाप्यात 2.37 रुपये रोकड आणि 2.89 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. एंट्री ऑपरेटर संजय जैन आणि त्याच्या लाभार्थींच्या एकूण 42 ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली, त्यामध्ये मोठा माल विभागाला मिळाला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही धाडसत्र सुरूच असून पैसे आणि ज्वेरली ताब्यात घेण्यात आली आहे. तब्बल 42 ठिकाणांवर ही धाड टाकण्यात आली असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. हैदराबामध्ये यापूर्वी आयकर विभागाने मोठी धाड टाकली होती, त्यावेळी एका महसूल अधिकाऱ्याकडून मोठी संपत्ती जप्त करण्यात आली होती केंद्रीय आयकर विभागाने खोट्या बिलाच्या आधारे रोकड जमा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. विभागाने आपल्या कारवाई मोठ्या प्रमाणात रोकड आणि मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या आहेत. आयकर विभागाकडून अद्यापही छापेमारी सुरू असून आणखी घबाड मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेटॅग्स :मुख्य आयकर आयुक्त कार्यालयधाडपोलिसगोवाIncome Tax OfficeraidPolicegoa