Independence Day 2020 : फाळणीनंतर पाकिस्तानला नाणेफेकीमध्ये मात देऊन भारताने मिळवली होती ही ऐतिहासिक वस्तू...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 05:15 PM2020-08-15T17:15:21+5:302020-08-15T18:26:12+5:30

अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे उदयास आल्यावर देशातील संपत्तीचीही वाटणी झाली होती. या वाटणीदरम्यान जमीन, पैसे आणि सोन्यासह इतरही काही महत्वाच्या वस्तूंची वाटणी झाली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळत असतानाच देशाच्या फाळणीची वेदनादायी घटना घडली होती. अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे उदयास आल्यावर देशातील संपत्तीचीही वाटणी झाली होती.

या वाटणीदरम्यान जमीन, पैसे आणि सोन्यासह इतरही काही महत्वाच्या वस्तूंची वाटणी झाली होती. यावेळी तत्कालीन व्हाइसरॉय यांच्या ताफ्यातील वस्तूंचीही वाटणी करण्यात आली. व्हाइसरॉय यांच्या अंगरक्षकांची भारत आणि पाकिस्तानमध्ये २:१ च्या प्रमाणात विभागणी करण्यात आली.

मात्र व्हाइसरॉय यांच्याकडील एका ऐतिहासिक वस्तूवर दोन्ही देशांनी दावा केला. ती वस्तू होती व्हाइसरॉय यांची बग्गी. व्हाइरसॉयची ओळख असलेली ही बग्गी आपल्याकडे असावी, असे दोन्ही देशांना वाटत होते.

या बग्गीवरून वाटणीत झालेला तिढा सोडवण्यासाठी अखेरीच नाणेफेक घ्यायचे निश्चित झाले. त्यानुसार नाणेफेक झाली आणि त्यात ही ऐतिहासिक बग्गी भागताने जिंकली.

व्हाइसरॉयची ही बग्गी ताब्यात आल्यानंतर तिची पाठवणी राष्ट्रपतींच्या ताफ्यात करण्यात आली. १९५० च्या प्रजासत्ताक दिनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी या बग्गीचा प्रथम वापर केला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांनी ही ऐतिहासिक बग्गी पुन्हा वापरात आणली. राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनासारख्या ऐतिहासिक प्रसंगी सोहळ्याला येताना ही बग्गी वापरतात.

देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही विशेष प्रसंगी या बग्गीचा वापर केला आहे.