Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी... By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:02 AM 2019-08-15T11:02:19+5:30 2019-08-15T11:17:06+5:30
भारतात पहिल्यांदा 1951मध्ये निवडणूक घेतली गेली. यामध्ये 45.7 टक्के मतदान झालं होतं.
1966मध्ये रेटीया फरिया पॉवेलने ही मिस वर्ल्ड किताब मिळवणारी पहिली आशियाई महिला ठरली.
1974मध्ये भारताने पोखरण चाचणी करुन आण्विक शस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या यादीत जागा मिळवली.
आर्यभट्ट हा पहिला सॅटेलाइट भारताने १९७५ मध्ये अवकाशात सोडला.
1983 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.
राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. त्यांनी हे 1984 मध्ये केले होते.
1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारत टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतले.
2005 भारताने माहिती अधिकार अमलात आणला. हा अधिकार जगातील मोजक्याच देशांमध्ये आहे.
पहिल्यांदाच प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या होत्या.
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरत, क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला.
अभिनव बिंद्रा याने 2008 बिजिंग ऑलंम्पिकमध्ये १०एम एअर रायफल स्पर्धेत वैयक्तीत सुवर्ण पदक जिंकले. हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे.
संगीतकार ए.आर.रहमान याला 2009 मध्ये 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले.
अग्नि-5 क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता 2012 मध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.
मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून 2013 रोजी प्रक्षेपित केले गेले.
कैलाश सत्यार्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
देशातील व्यवस्थेला हादरा देण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तरूणाई अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ 2011 ला उपोषणात सहभागी झाली.
2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता. यानंतर 2019मध्ये इस्रोचे चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं...
तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे...
जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविण्यात आलं. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख यांची केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली.