15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 05:26 PM 2020-07-19T17:26:42+5:30 2020-07-19T17:51:22+5:30
गेल्या 15 जूनला पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत कर्नलसह दोन भारतीय जवानांना वीरमरम आलं. या जवानांच्या बलिदानाचा बदला बिहार रेजिमेन्टच्या जवानांनी त्याच रात्री घेतला होता.
कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या जवानांनी चिनी शिबिरात असा विध्वंस केला, की चीनची अजूनही त्याचा स्वीकार करण्याची छाती होत नाही. यात गलवानमध्ये तैनात असलेल्या आर्टिलरी रेजीमेन्टच्या शिख जवानांनीही मोठे शौर्य दाखवले.
गलवानमध्ये झालेल्या हिंसक झटापटीसंदर्भातील सिच्यूएशन रिपोर्टनुसार, चिनी सैनिकांनी टोकदार तारा लावलेल्या काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात संतोष बाबू आणि जवानांना वीरमरण आले होते. यानंतर बिहार रेजिमेन्टच्या जवानांनी जवळपास 200 मीटर दूर असलेल्या बेसवरून बंदूका घेत नळ्यांना संगिनी लावल्या आणि रात्रीच्या अंधारात 40 जवान ‘जय बजरंग बली’ आणि ‘बिरसा मुंडा’ की जय म्हणत चिनी शिबिरावर तुटून पडले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधारात अचानक सुरू झालेल्या बायोनट फाइटमुळे (संगिनीने हल्ला) चिनी सैनिक पडू लागले. यानंतर चिनी सैन्याकडूनही प्रत्युत्तर मिळाले. मात्र, तोवर भारतीय जवानांनी आपले काम पूर्ण केले होते.
आर्टिलरी रेजिमेन्टच्या शिख जवानांनी अनेक चिनी सैनिकांच्या माना मोडल्या. या झटापटीत भारतीय जवानांनाही गंभीर दुखापत झाली. यात 18 जवानांना वीरमरण आले. अंधार आणि गडबडीमुळे चिनी सैनिकांच्या मृत्यूचा बीनचूक आकडा समजू शकला नाही.
सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, त्या रात्री जवानांनी शत्रूच्या मनात धडकी भरवली. एवढेच नाही, तर चिनी सेन्याच्या सीओ दोन इतर अधिकाऱ्यांनाही बंदी बनून आणले होते. तिकडे, चिनी सैनिकांनीही काही भारतीय अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते. काही दिवसांनंतर याच चिनी अधिकाऱ्यांच्या बदल्यात भारतीय जवानांना सोडण्यात आले.
बंधारा फुटल्याने चिनी टेन्ट उखडले सैनिकही मेले - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, की चीनने गलवान नदीवर एक छोटा बंधारा तयार केला होता. त्या रात्री तो बंधारा अचानक फुटला. यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह चिनी शिबिराच्या दिशेने गेला. बोलले जाते, की यात चिनी सैनिकांचे अनेक टेन्ट नष्ट झाले आणि सैनिकही मारले गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक जखमी भारतीय जवान गलवान नदीच्या जवळपास दिसून आले, ते ठंडीमुळे गंभीर स्थितीत होते.
गोळी नाही...चाकू तर चालवू शकतो... - भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सीमा व्यवस्थापन करारानुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) शस्त्र घेऊन एकमेकांसमोर येत नाहीत. 15 जूनलाही असेच होते. कर्नल बाबू आपल्या काही सहकाऱ्यांसह शस्त्र न घेता चिनी सैन्याकडे बोलायला गेले होते.
चिनि सैनिकांकडेही शस्त्र नव्हते. मात्र, ते तेथे काठ्यांना काटेरी तारा गुंढाळून तयार होते. यानेच कर्नल संतोष बाबू यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. यातच त्यांना वीर मरण आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर बिहार रेजिमेन्टने येथे गोळी चालवली जाऊ शकत नाही, तर चाकूने हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि ते संगिनीसह चिनी सैन्यावर तुटून पडले.