india china border tension air force on alert
India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:31 PM2020-06-20T12:31:13+5:302020-06-20T13:17:33+5:30Join usJoin usNext लडाखच्या गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी सैन्याच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच, काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, की 'ना आपल्या सीमेत कुणी घुसखोरी केली आहे, ना आपल्या कुण्या पोस्टवर कुणी कब्जा केला आहे. लडाखमध्ये आपल्या 20 शूर जवानांनी बलिदान दिले. मात्र, भारत मातेकडे तिरप्या नजरेने पाहणाऱ्यांना त्यांनी जबरदस्त धडा शिकवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने काही कृत्य करू नये म्हणून हवाई दलाने पूर्ण तयारी केली आहे. जर तशी परिस्थिती निर्माण झालीच, तर चोख उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने तेथे मिराज-2000 फायटर जेटपासून ते चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्सदेखील तयार केले आहेत. पूर्व लडाख भागात चीनने पुन्हा धोकेबाजी करू नये, म्हणून लेह भागात भारतीय हवाई दलाच्या हालचाली वाढल्या आहेत. लेहच्या आकाशात भारतीय हवाई दलाची विमानंही गस्त घालताना दिसली आहेत. तसेच एयर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनीही नुकताच लेह दौरा करून एअरबेसची पाहणी केली. हवाई दल प्रमुखांचा हा दौरा अनपेक्षितपणे झाला होता. यामुळे सद्य स्थितीत तो महत्वाचा मानला जात आहे. लेह बरोबरच त्यांनी श्रीनगरच्या एयरबेसचीही पाहणी केली. यापूर्वी भत्यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांचीही भेट घेतली होती. हवाई दल प्रमुखांच्या दौऱ्याबरोबरच लडाख लगत असलेल्या एअर बेसवर मिराज- 2000 विमानं तैनात करण्यात आली आहेत. सुखोई-30 विमानांनाही चीनचा सामना करण्यासाठी फॉरवर्ड लोकेशनवर तैनात करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर लडाखमध्ये अपाचे आणि चिनूक हेलीकॉप्टर्सदेखील तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय अंबाला, आदमपूर आणि बरेली एयरबेसदेखील संकटाच्या स्थितीसाठी अलर्टवर ठेवण्यात आली आहेत. चीनविरोधात भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज एलएसीवर निर्माण झालेली परिस्थिती चीननेच निर्माण केली आहे. तसेच आहे ती परिस्थिती बदलण्याची त्याची इच्छा आहे. या परिस्थितीपूर्वीही चीनने, चौतीसशे किलो मीटरहून लांब असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेकदा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. एलएसीवरील भारत-चीनदरम्यान करार झालेले असतानाही चीनने अनेकदा दुर्लक्ष केले. 15 जूनला गलवान भागात चीनने जे केले, त्यानंतर या सैन्य कराराची समीक्षा करण्यात यावी, असे माजी लष्कर प्रमुख रिटायर्ड जनरल व्ही. पी. मलिक यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 1993, 1996 आणि 2005मध्ये झालेल्या अव्यावहारिक भारत-चीन सैन्य कराराची समीक्षा व्हायला हवी. मी याची 1997पासूनच मागणी करत आहे. आर्टिकल 10चे पाल होत नसेल आणि LACदेखील स्पष्ट नसेल तर, आपण सेन्याकडून आर्टिकल 2 ते 9चे पालन करण्याची आशाच करू शकत नाही. चीन भारतासोबत धूर्तपणे वागत आहे यात कसलीही शंका नाही. मात्र, यावेळी भारत चीनला चोख उत्तर देत आहे. मॉस्को येथे जात असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तेथे चीनच्या नेत्यांना भेटणार नाहीत.टॅग्स :सीमा वादसीमारेषाभारतभारतीय हवाई दलनरेंद्र मोदीलडाखborder disputeBorderIndiaindian air forceNarendra Modiladakh