India China FaceOff: 'Bhabha Kavach' for troop safety; The AK-47 tablet will not penetrate
India China FaceOff: जवानांच्या सुरक्षेसाठी ‘भाभा कवच’; एके ४७ ची गोळीही भेदणार नाही, जाणून घ्या वैशिष्ट्ये By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:11 PM2020-09-14T14:11:28+5:302020-09-14T14:15:09+5:30Join usJoin usNext लडाख सीमेजवळ भारत आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी कधीही संघर्ष होऊ शकतो असं बोललं जातं. या तणावाच्या स्थितीत भारतीय जवानांसाठी दिलासादायक बातमी आहे. हैदराबादस्थित एक कंपनी, अॅलोय निगम लिमिटेड, अर्थात मिधानीने बुलेट प्रूफ वाहनांच्या पुरवठ्यासह एक अनोख्या सैन्याचं कवच निर्माण केले आहे.ज्यात गोळ्याही घुसू शकणार नाहीत. हे कवच केवळ सुरक्षाच्या बाबतीतच आंतरराष्ट्रीय मानकांशी जुळत नाही तर ती सुधारित करण्यासही वाव आहे. होय, जगभरात विकसित होणाऱ्या शस्त्रास्त्रांचे निरीक्षण करून हे कवच अधिक मजबूत आणि अभेद्य बनविण्यासाठी आपण सतत अपग्रेड करण्यास तयार असल्याचे मिधानी कंपनीनं स्पष्ट केले आहे. तसेच अशा प्रकारचे कवच मोठ्या प्रमाणात उत्पादित करुन पुरवले जातील. जाणून घेऊया, या सुरक्षा कवचाचं वैशिष्टे आणि सैनिकांसाठी किती प्रभावी आहे बुलेट प्रूफ'भाभा कवच' कसं आहे? हे कवच भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) च्या तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्याचे नाव 'भाभा कवच' असं ठेवले गेले. हे बुलेट प्रूफ जॅकेट फक्त सामान्यच नाही तर एके ४७ मधून बाहेर पडणाऱ्या गोळ्या रोखण्यासही सक्षम आहे असा दावा केला आहे. या प्रकारचे शेकडो जॅकेट्स देशाच्या निमलष्करी दलांना पाठवण्यात आलं आहेत. बीएआरसीच्या मते, हे कवच फक्त ६.८ किलो वजनाचे आहे, जे बॅलिस्टिक प्रूफ जॅकेटच्या तुलनेत हलकं आहे. गुजरातमधील फोरेंसिक सायन्स युनिव्हर्सिटीत फायरिंग ट्रायलमध्ये हे जॅकेट प्रभावी ठरले. बोरॉन कार्बाईड आणि कार्बन नॅनोट्यूब तंत्र पूर्णपणे स्वदेशी कवचमध्ये वापरले गेले आहेत. या जॅकेटमध्ये चार कडक सुरक्षा प्लेट्स आहेत, जे संरक्षण प्रदान करतात आणि कार्बन कोटिंगमुळे त्याला मजबूत बनवतात. अत्यंत लवचिक पॉलीथिलीन थर असलेले हे जॅकेट इनसास आणि एसएलआर रायफल्सच्या बुलेटमधील गोळ्याही भेदू शकत नाही. या प्रकारच्या चॅकेटबरोबरच, संरक्षणाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी बुलेट प्रूफ हेल्मेट, संरक्षक बुलेट प्रूफ जॅकेटच्या संरक्षणासाठी पूर्णपणे कस्टमाइज्ड आर्मर प्रणालीही विकसित केली जात आहे. देशाच्या गृह मंत्रालयाने बीआयएस स्तर -६ च्या धर्तीवर बुलेट प्रूफ जॅकेट तयार केले जात आहेत. मिधानी म्हणतात की ही योग्य वेळ आहे, केवळ कवचसाठीच नाही तर अभेद्य वाहने तसेच सैनिकांसाठी उपयुक्त अशी इतर संरक्षणात्मक उपकरणे देखील देशामध्ये तयार करायची आहेत. सुरक्षा दलांच्या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मिधानीने अशी बुलेटप्रूफ वाहने बनविली आहेत, ज्याच्या टायर्समध्ये गोळी लागली तरीसुद्धा ते १०० किमी धावतील. त्याला तांत्रिक भाषेत रनफ्लाट टायर म्हणतात. हे देशातील पहिले Isuzu आधारित लढाऊ वाहन असून शस्त्रास्त्रे असलेल्या सात सैन्यासाठी उपयुक्त आहे, त्वरित रिस्पॉन्समध्ये वापरले जाऊ शकते आणि घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य किंवा एस्कॉर्ट वाहन म्हणून देखील वापरले जाऊ शकते. संरक्षण क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी पुढाकार म्हणून मिधानी क्रॉस-बॉर्डर आणि डिफेन्स वाहने बनवित आहेत, या अहवालानुसार तज्ञांचा असा विश्वास आहे की संरक्षण मंत्रालय हे खरेदी करू शकेल.टॅग्स :भारतचीनसंरक्षण विभागIndiachinaDefence