India China FaceOff: BRO starts process for 135-km road near LAC from Chushul to Demchok
करारा जवाब मिलेगा! LAC वर भारतानं सुरू केली 'अशी' तयारी; चीनचा झाला जळफळाट By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:26 PM2023-01-24T14:26:10+5:302023-01-24T14:28:37+5:30Join usJoin usNext चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर असून भारत आता चीनला जशास तसं चोख प्रत्युत्तर देत आहे. सीमेवर सैनिकांची तैनाती असो किंवा पायाभूत सुविधांची उभारणी असो. भारत सरकारनं आता प्रत्येक आघाडीवर ड्रॅगनचा मुकाबला करण्याची तयारी केली आहे. LAC जवळ ड्रॅगन चीन सैनिकांना राहण्यासाठी गावापासून घरे बांधत आहे. आता भारताने LAC वरील चुशूल ते डेमचौक हा १३५ किलोमीटर लांबीचा महामार्ग पुढील दोन वर्षांत बांधण्याची तयारीही केली आहे. LAC च्या बाजूने बांधलेल्या या महामार्गाच्या माध्यमातून चीनचा मुकाबला करणे सोपे होणार आहे. हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रणनीती दृष्टिकोनातून महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) वर ते बांधण्याचे काम सोपवण्यात आले आहे. BRO ने चुशुल-डेमचौक-फुक्चे-डेमचौक महामार्गाच्या बांधकामासाठी २३ जानेवारीला निविदाही जारी केली आहे. हा रस्ता सीडीएफडी रोड म्हणूनही ओळखला जातो. सिंगल लेन हायवे बांधण्यासाठी सुमारे २ वर्षे लागतील आणि त्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मागील अनेक दशके याठिकाणी भारताला हे उभारता आली नाही. हा हायवे LAC सोबत सिंधू नदीपासून लेहमधील भारत-चीन सीमेपर्यंत जाईल. विशेष म्हणजे हा रस्ता गेल्या अनेक दशकांपासून चिखलाने भरलेला होता. चीनने सीमेवर भक्कम पायाभूत सुविधा उभ्या केल्या असताना हा रस्ता का बांधला जात नाही, असा प्रश्न अनेकवेळा भारतीय अधिकार्यांसमोर आला. १९६२ मध्ये चुशुलमध्येच चीनशी युद्ध झाले होते. चुशूल हा तोच भाग आहे जिथे १९६२ मध्ये रेंजाग ला ची लढाई झाली होती. डेमचौक हा असा परिसर आहे जिथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्षाचा इतिहास आहे. हा नवा रस्ता धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. याद्वारे सैनिकांना सीमेवर नेणे खूप सोपे होणार आहे. याशिवाय येथील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. हा रस्ता ७ मीटरपेक्षा जास्त रुंद असेल. या रस्त्याची रुंदी ७.४५ मीटर असेल. या महामार्गावर ३ महत्त्वाचे पूल असणार आहेत. BRO ने २०१८ मध्ये या रस्त्याचा DPR पूर्ण केला होता. सोमवारी हा महामार्ग तयार करण्याचे टेंडर काढले आहे. लेह परिसरातील ही दुसरी मोठी तयारी असेल. उल्लेखनीय म्हणजे, लडाखमध्ये नायमो एअरफील्ड बांधण्यासाठी बीआरओने गेल्या महिन्यात निविदा मागवल्या आहेत. हे सर्वात उंच विमानतळ असेल. इथून LAC फक्त ५० किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या बांधकामासाठी एकूण २१४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे चीनच्या सीमेवरील वाढत्या कारवाया रोखण्यासाठी भारतही पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर देत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही वर्षांपासून स्थिती सातत्याने बदलत आहे. त्यामुळे अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी अलीकडेच लडाख सीमेवरील स्थिती जाणून घेतली त्यामुळे भारत आणखी सतर्क झाला आहे.टॅग्स :भारतचीनIndiachina