india china faceoff conflict about depsang valley at ladakh
गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 08:29 PM2020-06-26T20:29:30+5:302020-06-26T20:48:17+5:30Join usJoin usNext सीमेवर भारत आणि चीन यांच्यात जबरदस्त तणाव आहे. चीनने आधी पेंगाँग सरोवराजवळ भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. यानंतर भारताच्या हद्दीत असलेल्या गलवान खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न केला. याच भागात 15 जूनला रात्रीच्यावेळी दोन्ही सैन्यांत हिंसक झटापट झाली होती. आता चीन दौलत बेग ओल्डी आणि देपसांग भागात भारतीय जवानांसाठी डोकेदुखी ठरत आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर, चीनने एलएसीवरील पेंगाँग सरोवराच्या भाहात तणाव वाढवला. चीनने येथे मोठ्या प्रमाणावर सैन्य जमले आहे. मात्र, असे असले तरी चीनच्या कोणत्याही कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही या भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहेत. 15 जूननंतर, अद्याप कसल्याही प्रकारची चकमक झालेली नाही. सॅटेलाईटने घेतलेल्या छायाचित्रांवरून दिसते, की अद्याप चीनी सैन्य मागे हटलेले नाही. उलटपक्षी त्यात भरच पडली आहे. कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात 15 जूनला, जेथे भारतीय जवान आणि चिनी सैन्यात चकमक झाली होती, तेथे आता चीनने नवी पोझिशन घेतली आहे. ग्राउंड झिरोवरील हाय लेव्हलची पोझशन दाखवते, की 15 जूननंतर दोन्ही देशांच्या सैन्याने येथे नवे टेंट तयार केले आहेत. पूर्व लडाखमधील काही नव्या भागांत चीन, सैन्याची जमवाजमव करत आहे. यावरून चीनची पीपल्स लिब्रेशन आर्मी दौलत बेग ओल्डी (डीबीओ) आणि देपसांग भागांत नव्या कुरापती करण्याचे संकेत मिळत आहेत. जून महिन्यात चीनी बेसजवळ कॅम्प आणि वाहने दिसून आली होती. चीनने हे बेस 2016पूर्वीच तयार केले होते. मात्र, या महिन्यात सॅटेलाइटने घेतलेल्या छायाचित्रांतून दिसून आले आहे, की येथे नवी शिबिरे आणि वाहनांसाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. सॅटेलाइटच्या छायाचित्रांतून स्पष्ट होते, की चीन आश्वासनांनुसार मागे सरकलेला नाही. येथे चिनी तंबू आणि स्टोरेजची क्षमता वाढली आहे. ही भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे, हे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. हे भाग भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. चीनचा डोळा काराकोरम खोऱ्यावर आहे. यामुळेच तो काराकोरम भागांत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. चीन भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंग प्वाइंट 10 आणि 13 वरही आडकाठी टाकण्याचा प्रत्न करत आहे. मात्र, असे असताना भारतानेही या भागांत आपली उपस्थिती वाढवली आहे. अजूनही दोन्ही देशांत बोलणी सुरू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे.टॅग्स :सीमा वादसीमारेषाभारतलडाखचीनborder disputeBorderIndialadakhchina