India coronavirus cases originated from europe and middle east IISc latest research
भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 07:22 PM2020-06-09T19:22:50+5:302020-06-09T19:40:42+5:30Join usJoin usNext SARS-CoV2 व्हायरसपासून तयार झालेला कोविड-19 (कोरोना व्हायरस) संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. असे म्हटले जाते, की हा व्हायरस भारतात चीनमधून आला. मात्र, याच्या सत्यतेसंदर्भात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (IISc) संशोधकांनी एक विशेष दावा केला आहे. IIScच्या संशोधनात दावा करण्यात आला आहे, की हा व्हायरस चीन शिवाय, युरोप, मध्य आशिया, ओशिआनिआ आणि दक्षीण आशियाच्या भागातून आला आहे. जेथून सर्वाधिक प्रवासी भारतात आले. यासंदर्भात संशोधन करणाऱ्या आयआयएससीच्या संशोधक टीममध्ये मायक्रोबयोलॉजी आणि सेल बयोलॉजीचे प्राध्यापक कुमारावेल सोमसुंदरम, मायनक मंडल आणि अंकिता सहभागी होते. त्यांनी हे वैज्ञानिक संशोधन जीनोमिक्स स्टडीच्या आधारे केले आहे. या संशोधकांनी व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्ससंदर्भात सविस्तर विश्लेषण केले आणि भारतातील व्हायरसचे मूळ, तसेच महत्वाच्या आनुवांशिक व्हेरिएन्टसचे संभाव्य स्रोत शोधले आहेत. करंट सायन्सच्या लेखात लिहिले आहे, की '137 पैकी 129 भारतीयांमध्ये SARS-CoV2 हे या देशांच्या लोकांशी मिळते जुळते होते. 'क्लस्टर-ए'च्या सॅम्पलमधून, भारतीय सॅम्पल ओशिआनिआ, कुवेत आणि दक्षीण आशियन सॅम्पल्स प्रमाणे होते. तर 'क्लस्टर-बी'चे सॅम्पल यूरोपियन सॅम्पल्सशी मिळते-जुळते होते. काही सॅम्पल्स मध्य आशिया आणि दक्षीण आशियातील सॅम्पल्स सारखे होते, असे या विश्लेषणातून, समोर आले आहे'. या निकालावरून स्पष्ट होते, की अधिकांश भारतीयांमध्ये जो कोरोना व्हायरस आढळून आला, तो मुख्यतः युरोप, मध्य आशिया, दक्षीण आशिया आणि ओशिआनियातील आहे.' 137 सॅम्पल्सपैकी 8 सॅम्पल असे होते, जे चीन आणि पूर्व आशियातील सॅम्पल्सशी मिळते-जुळते होते. यावरून सिद्ध होते, की हा व्हायरस चीन आणि इतर शेजारील देशांतून आलेल्या भारतीयांमुळेही पसरला. संशोधकांनी म्हटले आहे, की 'भारतात SARS-CoV2 यूरोप आणि ओशिआनिआ येथूनही आल्याची शक्यता आहे. याशिवाय याचा स्त्रोत मध्य-आशिया आणि दक्षीण एशियाचा भागही असू शकतो.' संशोधकांनी म्हटले आहे, की भारतीय रुग्णांची कॉन्टॅक्ट हिस्ट्री आणि प्रवासाची माहिती नसल्याने या व्हायरसचा मूळ स्त्रोत कुठला आहे इथपर्यंत पोहोचने अवघड आहे. तसेच या संशोधनातून असेही समोर आले आहे, की ज्यात भारतीय नागरिकांनी अधिक प्रवास केला त्या देशांचे आणि व्हायरसचेही कनेक्शन आहे. रॅपिड व्हायरस जीनोम सिक्वेन्सची पावर आणि पब्लिक डेटा शेअरिंगने या कोरोना व्हायरसची ओळख करणे आणि व्यवस्थापन, या दोन्ही गोष्टी शक्य आहेत, असेही या संशोधनात म्हणण्यात आले आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसभारतचीनcorona virusCoronavirus in MaharashtraIndiachina