दहशतवादाविरोधात भारत, रशिया आणि चीन एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 21:35 IST2017-12-11T21:29:58+5:302017-12-11T21:35:13+5:30

नवी दिल्लीत आज भारत, रशिया आणि चीन(आरआयसी) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली.

भारत, रशिया आणि चीन दहशतवादाविरोधात एकत्र आले आहेत. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असल्याचं मत तिन्ही देशांनी मांडलं आहे.

तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दहशतवाद्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कोणत्याही एका दहशतवादी संघटनेचं नाव घेतलेलं नाही.

परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला फटकारलं आहे.