ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 11:02 AM2018-04-13T11:02:24+5:302018-04-13T11:02:24+5:30

आग्रामध्ये बुधवारी (12 एप्रिल) सायंकाळी आलेल्या वादळाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणा-या ताजमहालालाही बसला आहे.

या वादळामुळे ताजमहालाच्या दक्षिण गेट आणि रॉयल गेट्सचे दगडी मिनार कोसळले. तसंच ताजमहालाचा पांढऱ्या रंगाचा छोटा घुमटही पडून तुटला आहे.

ताजमहालचा मुख्य दरवाजा आणि दरवाजा-ए-रौजावरील 12 फुटी मिनारही वादळात कोलमडला आहे. ताजमहालचे दर्शन सर्वात प्रथम याच दरवाजातून होत असते.

अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले दिसले.

2016मध्येही ताजमहालचे मिनार कोसळल्याची घटना घडली होती. साफसफाईच्या कामामुळे हे मिनार कोसळले असावेत, अशी शक्यता त्यावेळेस वर्तवण्यात आली होती.