चिन्यांना राफेल पडणार भारी; सीमेवर शत्रूचे शक्तीशाली विमान घिरट्या घालू लागले By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:40 PM 2020-07-20T15:40:03+5:30 2020-08-31T17:21:14+5:30
India Vs china Face off: पाकिस्तानला अमेरिकेने दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानाला भारतीय विमानांनी आधीच पाडले आहे. यामुळे पाकिस्तानच्या विमानांना प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताकडे असलेली विमानेच खूप आहेत. तर चीनच्या सीमेवर वाढलेला तणाव पाहता राफेलला चीनचे Chengdu J-20 हे लढाऊ विमान तुल्यबळ ठरणार आहे. भारताला फ्रान्सकडून या आठवड्यात सहा राफेल लढाऊ विमाने मिळणार आहेत. आशियात भारतीय हवाई दलाचा दबदबा आहेच, पण राफेलमुळे तो आणखी वाढणार आहे. हे लढाऊ विमान भारताला जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये कोणत्याही हवामानात लढण्यास सक्षम आहे. राफेल चीनच्या सीमेवर तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानला अमेरिकेने दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानाला भारतीय विमानांनी आधीच पाडले आहे. यामुळे पाकिस्तानच्या विमानांना प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताकडे असलेली विमानेच खूप आहेत. तर चीनच्या सीमेवर वाढलेला तणाव पाहता राफेलला चीनचे Chengdu J-20 हे लढाऊ विमान तुल्यबळ ठरणार आहे.
राफेल आणि जे 20 ही दोन्ही विमाने एका सीटची आहेत. तसेच ट्विन इंजिन आहे. चीनी जे 20 चे बलस्थान स्टील्थ फाइटर आहे. तर राफेल अनेक कामांसाठी वापरता येणार आहे. चीन J-20 चा वापर हा दुश्मनावर नजर ठेवण्यासाठी करतो. तर राफेल नजर ठेवण्यासह तात्काळ हल्ला करण्य़ासाठीही वापरता येते.
राफेलला भारतीय गरजेनुसार मॉडिफाय करण्यात आलेले आहे. यामुळे हे विमान चीनच्या जे 20 वर वरचढ आहे.
पाकिस्तानसोबत चीनने मिळून JF-17 हे विमान विकसित केले आहे. हे विमान बहुपयोगी आहे. जे हवेतून हवेत आणि जमिनिवर मारा करू शकते. चीनने या लढाऊ विमानाला PF-15 मिसाईल डागण्याजोगे बनविले आहे. यामध्ये इन्फ्रारेड सिस्टिम लावण्यात आलेली आहे.
या मिसाईलची रेंज ही 300 किमी आहे. हे सर्वात अद्ययावत मिसाईमध्ये गणले जाते. राफेलला जोडण्यात आलेली मिसाईलची रेंज यापेक्षा कमी आहे. PF-15 मिसाईलला अमेरिकेने विरोध केला होता.
चीनचे J-20 विमान राफेलच्या तुलनेत जास्त ताकदवान आहे. राफेलचे शस्त्रास्त्रांसमवेत 24,500 किलो वजन होते. तर J-20 34 ते 37 हजार किलो वजन (विमानासहित) घेऊन जाऊ शकते. राफेल की रेंज 3,700 किलोमीटर आहे. तर J-20 ची बेसिक रेंज ही केवळ 1200 किमी आहे. ती वजन कमी केल्यास 2700 किमी वाढविता येते.
दोन्ही लढाऊ विमाने आपल्यासोबत चार मिसाईल घेऊन उड्डाण करू शकतात. दोघांचा वेगही जवळपास सारखाच आहे. (2100-2130 किलोमीटर प्रतितास)
मात्र, चीनचे जे 20 लढाऊ विमान या ठिकाणी राफेलसमोर गुडघे टेकते. डोंगररांगांमध्ये राफेल खूप शक्तीशाली आहे. जे 20 ची लांबी 20.3 ते 20.5 मीटर आहे. तर उंची 4.45 मीटर आणि पंख 12.88-13.50 मीटर आहेत.
तर राफेलची लांबी 15.30 मीटर आणि उंची 5.30 मीटर आहे. तसेच पंखांची लांबी 10.90 मीटर आहे. यामुळे डोंगररांगांमध्ये अचानक वळण्यासाठी आणि प्रतिहल्ला करण्यासाठी राफेल सरस आहे. भारत- चीनची सीमा मोठाल्या डोंगररांगांचीच आहे.
जे-20 मध्ये इंटरनल कॅनन लावलेला आहे. यामध्ये AESA रडार आहे. यामध्ये पॅसिव्ह इलेक्ट्रो ऑप्टिकल सिस्टिम असून पायलटला यामुळे 360 डीग्री व्ह्यू दिसतो. तसेच चीनच्या लष्कराच्या सॅटेलाईट आणि ड्रोनचा अॅक्सेस मिळवता येतो. राफेलमध्ये PL-15 मिसाईलपेक्षाही भारी मिसाईल आहे.
PL-15 मिसाईल रडारद्वारे चालते तर राफेलचे मिसाईल बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे दिसत नसलेले टार्गेटही उडविण्याचे सामर्थ्य आहे. म्हणजेच दुश्मनाचे विमान दिसत नसेल तरीही ते हवेतच उद्ध्वस्त करता येणार आहे.
स्कॅल्प मिसाइल किंवा स्ट्रॉम शॅडो सारखी मिसाईल कोणत्याही बंकरला उडवू शकतात. या मिसाईलची रेंज 560 किमी आहे. राफेल अण्वस्त्रेही वाहून नेऊ शकते.