भारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:40 PM2019-07-22T14:40:57+5:302019-07-22T14:46:50+5:30

भारत हे जगातलं आकर्षणाचं केंद्रबिंदू असून, इथे लांबून पर्यटक फिरण्यासाठी येतात. भारतातल्या काही ठिकाणी गेल्यावर मुद्रा एकदम प्रसन्न होते.

लडाखमध्ये एक रहस्यमय डोंगर असून, तिथे पेट्रोल-डिझेलशिवाय गाड्या धावतात.

हा डोंगर चमत्कारिक आहे. या डोंगरावर चुंबकीय शक्ती आहे.

हा डोंगर गाड्यांना जवळपास 20 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं खेचतो. त्यामुळे या डोंगराला मॅग्नेटिक हिलही म्हटलं जातं.

या मॅग्नेटिक हिलला ग्रॅव्हिटी हिलही संबोधलं जातं. गुरुद्वारा पठार साहिबच्या जवळपास चुंबकीय शक्ती आहे.

डोंगराच्या या चुंबकीय शक्तीमुळे आकाशातून उडणारी विमानंही भीतीनं दुरून जातात.