भारतीय हवाई दलाची शान 'मिग-27' निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 09:58 PM2019-12-27T21:58:56+5:302019-12-27T22:31:50+5:30

भारतीय हवाईदलाची शान म्हणून ओळख असलेले आणि जमिनीवर हल्ला करण्यात कुशल असलेले 'मिग-27' हे लढाऊ विमान आज निवृत्त झाले.

'मिग-27' श्रेणीतील विमानांचा इतर कोणताही देश वापर करत नाही. फक्त भारतात ही लढाऊ विमाने वापरली जात होती.

मिग श्रेणीतील विमाने मूळ रशियन बनावटीची आहेत. यापैकी 'मिग-23' व 'मिग-27' ही विमाने जमिनीवरून शत्रूच्या प्रदेशात खोलवर मारा करण्यात कुशल आहेत. यापैकी 'मिग-23' याआधीच निवृत्त झाले आहे, तर आता 'मिग-27' आज निवृत्त झाले.

आज जोधपूर एअरबेसवर विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी 'मिग-27' विमानांचा सन्मान करण्यात आला.

'मिग-27' श्रेणीतील विमानांचा इतर कोणताही देश वापर करत नाही. फक्त भारतात ही लढाऊ विमाने वापरली जात होती.

'मिग-27' हे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वोत्तम विमान आहे.

1999 मधील कारगील युद्धात ब्रह्मास्त्र ठरलेल्या 'मिग-27'ने भारतीय हवाई दलात जवळपास चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजवला आहे.