हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:58 PM2024-10-07T12:58:01+5:302024-10-07T13:03:30+5:30

जर कुणी म्हणेल भारताच्या सैन्यानं अमेरिकन मिलिट्रीला गुडघ्यावर टेकायला भाग पाडलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र भारतीय सैन्याच्या जबरदस्त ताकदीनं जगातील सर्वात मजबूत सैन्य हरलं आहे. पोलोच्या मैदानात हे प्रत्यक्षात घडलं आहे.

आपल्या खतरनाक फिटनेसनं भारतीय सैन्याने अमेरिकन सैन्याच्या टीमचा पराभव केला आहे. भारताने १३-१० या अंतराने हा सामना जिंकला आहे. भारतीय सैन्याच्या एरिना पोलो टीमने लेकसाइड पोलो क्लबमध्ये अटीतटीच्या लढतीत अमेरिकन सैन्याच्या टीमला हरवलं आहे. या सामन्यात भारतीय टीमनं १३-१० गुणतालिकेने अमेरिकन सैन्याला पराभूत केले.

अमेरिकन सैन्याच्या टीमविरोधात हा सामना जिंकणे भारतीय सैन्यासाठी आणि देशातील जनतेसाठी अभिमानस्पद आहे. त्यामुळे भारतीय जवान केवळ युद्धाच्या मैदानातच नाही तर खेळाच्या मैदानातही विरोधी टीमला धुळ चारण्यास पटाईत आहेत. भारतीय टीमच्या या सुपरहिट विजयाने अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

भारतीय टीममध्ये लेफ्टिनंट कर्नल पृथ्वी सिंह, लेफ्ट कर्नल यतिंदर कुमार, मेजर मृत्युंजय सिंह आणि लेफ्ट. कर्नल आरके गौतम यांचा समावेश होता. त्यांच्या शानदार खेळीमुळे अमेरिकन टीमला सामन्यात टिकता आले नाही.

भारतीय टीम आणि अमेरिकन आर्मी यांच्यात हा मैत्रीपूर्ण लढा होता. नेहमी दोन विविध देशात अशाप्रकारचे सामने खेळवले जातात. जे आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी आयोजित केले जातात.

एरिना पोलचा सामना आऊटडोर गेमसारखाच असतो परंतु तो ३०० बाय १५० फूट मैदानात खेळला जातो. या मैदानाच्या चारही बाजूला ४ फूट अथवा त्याहून अधिक उंचीची भिंत असते. नियमित पोलो मॅचसाठी १० एकर मैदान लागते. ज्यात सीमा ठरवली जाते परंतु कुठलीही भिंत नसते.

सुरुवातीला भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना बरोबरीचा सुरू होता. परंतु त्यानंतर भारताने बढत घेतली. सामना संपता संपना भारताने १३-१० या गुणतालिकेने अमेरिकन टीमचा पराभव खेला. कॅलिफोर्निया इथं ५ ऑक्टोबरला भारतीय सैन्य विरुद्ध यूएस मिलिट्री यांच्यात हा सामना खेळवला गेला.

भारतीय सैन्यातील खेळाडू मेजर मृत्युंजय सिंह यांना दुसऱ्या फेरीत दुखापत झाली होती. मात्र त्यांनी खेळ सुरूच ठेवला मात्र दुखापत जास्त वाढल्यानंतर लेफ्टनंट कर्नल आरके गौतमद्वारे यांना खेळायला मिळाले. विशेष म्हणजे २०१९ नंतर भारतीय सैन्याच्या टीमचं हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.