Indian Navy Day: A proud history of the Navy that started with the inspiration of Shivaji Maharaj
भारतीय नौदल दिवस: शिवरायांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या नौदलाचा अभिमानास्पद इतिहास By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:39 PM2019-12-04T13:39:36+5:302019-12-04T13:45:38+5:30Join usJoin usNext १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. 17 व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. नौदलातील पहिली महिला वैमानिक सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप डॉर्निअर विमान उडवून भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणार आहेत. बुधवारी देशभरात नौदल दिवस साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांआधीच कोची येथील नौदलाच्या तळावर झालेल्या एका कार्यक्रमात शिवांगी नौदलात दाखल झाल्या.टॅग्स :भारतीय नौदलछत्रपती शिवाजी महाराजindian navyShivaji Maharaj