भारताची हवाई शक्ती वाढली, स्वदेशी ड्रोन ‘अभ्यासची’ चाचणी यशस्वी झाली, अशी आहेत वैशिष्ट्ये
By बाळकृष्ण परब | Updated: September 23, 2020 16:41 IST2020-09-23T16:26:50+5:302020-09-23T16:41:30+5:30
भारताने अभ्यास या लडाऊ ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे. ओदिशामधील बालासोर येथे या ड्रोनची यशस्वी चाचणी करण्यात आली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवाई शक्तीमध्ये अजून एका अस्त्राची भर पडली आहे. भारताने अभ्यास या लडाऊ ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे. ओदिशामधील बालासोर येथे या ड्रोनची यशस्वी चाचणी करण्यात आली.
अभ्यास ड्रोनच्या यशस्वी चाचणीनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हे एक मोठे यश असल्याचे सांगत डीआरडीओचे अभिनंदन केले आहे,
अशी आहे अभ्यासची रचना
अभ्यास हा ड्रोन डीआरडीओच्या एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटकडून डिझाईन आणि विकसित करण्यात आला आहे. ट्विन अंडरस्लेंग बूस्टरच्या मदतीने हा ड्रोन लाँच करण्यात आला. डीआरडीओने अभ्यासला एका इन लाइन छोट्या गॅस टर्बाइन इंजनवर डिझाइन केले आहे. हा डिव्हाइस स्वदेशी रूपात विकसित मायक्रो- इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टिम- आधारित प्रणाली आहे. याचा उपयोग नेव्हिगेशनसाठी केला जातो. डीआरडीओने त्याची खास पद्धतीने रचना केली आहे. त्यामध्ये पाच मुख्य भाग आहेत. ज्यामध्ये नोज कोन, इक्विपमेंट बे, इंधन टँक, हवा बाहेर जाण्यासाठी एअर इंटेक बे आणि टेल कोन यांचा समावेश आहे.
अशा प्रकारे करतो काम
अभ्यास ड्रोन एका छोट्या गॅस टर्बाइन इंजनवर काम करतो. हा एमईएमएस नेव्हिगेशिन सिस्टिम आणि प्लाइट कंट्रोल कॉम्प्युटरच्या मदतीने काम चालवतो. अभ्यास या ड्रोनला पूर्ण स्वतंत्रपणे उड्डाण करण्याच्या दृष्टीकोनातून विकसित करण्यात आले आहे.
अभ्यास ड्रोनमध्ये ईपीईपासून बनवलेला एक बॉक्स आहे. त्यामध्ये एक क्रॉस लिक पॉलिएथलिन फोम सामुग्री आहे. त्यावर हवामान, दव आणि कंपनाचा कुठलाही परिणाम होत नाही.
कुठे होणार वापर
अभ्यासच्या रडार क्रॉस सेक्शन आणि व्हिज्युएल इंफ्रारेड सिग्नेचरचा वापर विविध प्रकारच्या विमानांमध्ये आणि हवाई सुरक्षा उपकरणांमध्ये करता येऊ शकतो. तसेच अभ्यास ड्रोन एक जॅमर प्लॅटफॉर्म आणि डिकॉयच्या रूपातही काम करू शकतो.