India's misssion moon, chandrayaan 2 launch success
भारताचे Mission moon, चाँद के पार चलो... By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 07:00 PM2019-07-22T19:00:36+5:302019-07-22T19:25:49+5:30Join usJoin usNext 130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणास असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मोहिमेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या कार्यालयातून पाहात होते, उड्डाणानंतर मोदींनीही आनंदीत होऊन टाळ्या वाजवल्या. 130 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचे उड्डाण असलेल्या चांद्रयान 2 च्या मोहिमेचा जल्लोष शाळांमध्येही पाहायला मिळाला. चांद्रयान 2 यानाचे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर इंस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि या मोहिमेचे प्रमुख के.सिवान यांनी उपस्थितांना आणि देशाला मार्गदर्शन करत चांद्रयान 2 ही मोहीम तिरंग्याचा सन्मान असल्याचे म्हटले. चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर श्रीहरी कोटा येथे उपस्थित शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला, उड्डाणानंतर आनंदाच्या भरात एकमेकांना जादू की झप्पीही दिली. इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनाही मोहीमेच्या यशानंतर अत्यानंद झाला, त्यांनी आपल्या सहकारी वैज्ञानिकांशी हस्तांदोलन करत सर्वांचे अभिनंदन केले विजयानंतरचा हा क्षण... जादू की झप्पी देताच गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या कामाचा शिणवटा नाहीसा झाला असेल चांद्रयान 2 च्या उड्डाणापूर्वी मिशन मूनची पाहणी करताना इस्रोचे प्रमुख के. सिवान आणि इतर शास्त्रज्ञ चिंतातूर होते, पण उड्डाण यशस्वी होताच त्यांच्यासह देशभरातील कोट्यवधी नागरिकांनी जल्लोष केला जागतिक पातळीवर देशाचं नाव रोशन करणाऱ्या चांद्रयान 2 मोहीमेचं सेलिब्रेशन तरुणाईनेही केलं. आपल्या तिरंगा काही दिवसांतच चंद्रावर फडकणार असल्याची साक्षच हा फोटो देत आहे.टॅग्स :चांद्रयान-2इस्रोChandrayaan 2isro