India's richest temple, whose wealth you will be amazed to hear!
भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर, ज्याची संपत्ती ऐकून व्हाल थक्क ! By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 08:48 PM2019-10-06T20:48:47+5:302019-10-06T20:51:47+5:30Join usJoin usNext देशामध्ये काही मंदिरे असेही आहे ज्यांची संपत्ती अब्जोपती उद्योगपतींपेक्षा जास्त आहे. केरळचं पद्मनाभ मंदिर हे त्यापैकीच एक असून, ते जगविख्यात आहे. त्याच्या ऐश्वर्यावर डोळा ठेवून अनेकांनी आक्रमणं केली, परंतु कोणालाही या मंदिराच्या तिजोरीला अद्याप हात लावता आलेला नाही. या मंदिराची संपत्ती सुद्धा ह्याच सोन्या चांदीमुळे वाढलेली आहे. पद्मनाभस्वामी, तिरुपती बालाजी आणि शिर्डीचे साईबाबा मंदिर ही देवस्थानं श्रीमंत आहेत. सौंदर्यानं आणि आध्यात्मिकतेच्या नाळेनं जोडलेलं मंदिर म्हणजे रहस्यांचा खजिना आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून, मंदिराच्या गर्भगृहात शेषनागावर शयन मुद्रेत भगवान विष्णूंची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरातील विष्णूची मूर्तीची किंमतच 500 करोड रुपये येवढी आहे. 17 किलो सोन्याचे शिक्के आहेत. खजिन्यात सापडलेला सोन्याचा हार दहा फुट लांब व 10.8 किलो सोन्याचा आहे. 536 किलो सोन्याचे शिक्के मंदिराकडे आहे. 20 किलो सोन्याची शिक्के ब्रिटिशकालीन आहेत. नेपोलियन काळातील बहुतांश शिक्के यामध्ये आहे. यासोबतच बहुमुल्य हिरे आणि खडे या मंदिराकडे आहे.