डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरक विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 09:29 PM2018-12-05T21:29:23+5:302018-12-05T21:44:26+5:30

बाबासाहेब आंबेडकर कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांच्या विचारांनी अनेकांना प्रेरणा दिली. यापुढेही त्यांच्या विचारांनी समाजाला प्रेरणा मिळत राहील.

दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. वंचितांसाठी, शोषितांसाठी बाळासाहेब कायम खंबीरपणे उभे राहिले.

सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात बाबासाहेबांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे.

कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते कायम आग्रही होते.

देशाची घटना लिहिण्याचं काम त्यांनी अतिशय जबाबदारीनं पार पाडलं. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं.